दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी म.ए.सो.मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथे
शिक्षण विवेक चा वर्धापन दिन उत्साहामध्ये पार पडला.
शिक्षण विवेकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिक्षणविवेक वर्धापनदिना निमित्त ऑगस्ट महिन्याच्या शिक्षणविवेक अंकाचे प्रकाशन मा.उपमुख्याध्यापिका सौ.जोशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शिक्षणविवेक अंकाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून शिक्षणविवेक वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
शिक्षणविवेक वर्धापनदिना निमित्त शिक्षणविवेक प्रतिनिधी श्रीमती खाडे मॅडम यांनी शिक्षणविवेकच्या भव्य परिवार बद्दलची माहिती सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणविवेक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले.
सावरककर अध्यासन केंद्र येथे सावरकर यांच्या स्मारकाला भेट व प्रशालेमध्ये सात दिवस विविध क्रांतिकारकांच्या कार्याचे स्मरण करून क्रांतिसप्ताह दिन संपन्न झाला.
शिक्षणविवेक वर्धापनदिन व क्रांतिसप्ताह दिन या कार्यक्रमाचे नियोजन मा.उपमुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती खाडे मॅडम,सौ.नांगरे मॅडम व सौ.बोरा मॅडम यांनी केले होते.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे पदाधिकारी मा.उपमुख्याध्यापिका सौ.जोशी मॅडम , मा. पर्यवेक्षक श्री.जायभाय सर व सकाळ विभाग व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व अध्यापक वर्ग , पाचवी ते सातवी व बारावीचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
अशा रितीने शिक्षण विवेकचा वर्धापन दिन व क्रांतिसप्ताह दिन साजरा करण्यात आला.