मुखपृष्ठ कार्यशाळा

21 Aug 2023 14:47:20
 
मुखपृष्ठ कार्यशाळा
शनिवार दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी 'शिक्षणविवेक' तर्फे स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे 'मुखपृष्ठ कार्यशाळे'चे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी मुखपृष्ठकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेसाठी ४० मुले उपस्थित होती. या कार्यशाळेमध्ये गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी मुलांना मुखपृष्ठ कसे काढावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवले. मुलांनीही दिलेल्या विषयावर मुखपृष्ठे काढली.
यामध्ये मुलांनी गिरीश सहस्रबुद्धे यांना आपल्या शंकाही विचारल्या. कार्यशाळेचा समारोप करताना 'शिक्षणविवेक'च्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मुलांसाठी अशा कार्यशाळांचे आयोजन यापुढेही करण्यात येईल, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0