नागपंचमी

21 Aug 2023 14:50:34

नागपंचमी
   नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून, नागदेवता प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा केली जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये नागाला विशेष स्थान आहे. पावसाळ्यात मराठी लोक नागपंचमी मोठ्या उत्साहाने आणि चैतन्याने सजरी करतात.
   असेही मानले जाते की, जे लोक कालसर्प दोषाने त्रस्त आहेत, त्यांनी जर नागपंचामीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केली, तर ते त्यांच्या नकारात्मक परिणामांपासून मुक्त होण्याची शक्यता असते. नाग या प्राण्याबद्दल आदर पूज्यभावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. वेदकाळापासून चालत आलेला हा सण, अत्यंत महत्वाचा मानला जातो. या सणाला विषेशत: गव्हाची खीर, चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची दिंड तयार केली जाते. पुरणपोळीही केली जाते. असे पदार्थ दाखवून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. नाग किंवा सापांमुळे शेतातील पिकांचे नुकसान करणार्‍या प्राण्यांपासून संरक्षण होते. या दिवशी शेतकरी सापांना इजा पोहोचू नये म्हणून शेतात नांगरत नाहीत आणि म्हणून सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो.
-प्रसाद झोरे, 
सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे.
Powered By Sangraha 9.0