नतमस्तक मी त्या सर्वांचा

23 Aug 2023 13:04:21
 
नतमस्तक मी त्या सर्वांचा
“सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा” हो खरोखरंच, या जगात माझा भारत देशच सर्वात सुंदर आणि वेगळा आहे. येथे विविधतेत एकता आहे. भारताची संस्कृती ही अन्य देशांच्या तुलनेत वेगळी आहे. भारताला अनेक महापुरुषांचा, संतांचा सहवास लाभला आहे. इथेच अनेक महान शास्त्रज्ञ, कलावंत, खगोलशास्त्रज्ञ, नेत्यांचा आणि वीरांचा जन्म झाला आहे. त्यांनी आपल्या सारख्या सामान्य माणसांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. संतांनी पवित्र असे विचार, भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिले आहेत. पूर्वी आपला देश सुखी, संपन्न, धनवान आणि समृद्ध होता, पण ब्रिटीश, पोर्तुगीज, डच यांसारख्या परकीय आक्रमणांमुळे भारताला एका वेगळ्या दयनीय अवस्थेतून जावं लागलं आहे, हे आपण जाणतोच. इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे, असं बोललं जातं आणि ते खरंच आहे. खेडी स्वयंपूर्ण होती. वस्तूविनिमय पद्धत प्रचलीत होती. पण ब्रिटीशांची वक्रदृष्टी आपल्या देशावर पडली आणि मग काय? देशाची प्रचंड आर्थिक लूट सुरू झाली. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर सेनानी, राष्ट्रभक्त यांचे कार्य अनमोल आहे. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे, अ‍ॅनी बेझंट, बिपीनचंद्र पाल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी किती तरी नावे आहेत ज्यांनी देशासाठी वेळप्रसंगी तरुंगवाद, प्राणाचे बलीदान दिले. अशा प्रसंगी कवी सजीवन मयंक यांची कविता आठवल्याशिवाय राहवत नाही.
आज तिरंगा फहराता है अपनी
पूरी शान से।
हमें मिली आजादी वीर शहीदों के
बलिदान से॥
आजादी के लिए हमारी लंबी चली लडाई थी।
लाखों लोगों ने प्राणों से कीमत
बडी चुकाई थी।
व्यापारी बनकर आए और छल से
हम पर राज किया॥
हमको आपस में लड़वाने की नीति
अपनाई थी॥
हमने अपना गौरव पाया, अपने
स्वाभिमान से।
हमें मिली आजादी वीर शहीदों के
बलिदान से ।
असे कित्येक महान नेते, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणून हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे आता प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशासाठी खूप वेळ किंवा पैसा खर्च नाही केला तरी चालेल, पण छोटे छोटे नियम काळजीपूर्वक पाळले पाहिजेत. कचरा न करणे, स्वच्छ ठेवणे ही सुद्धा राष्ट्रभक्तीच होय. आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे केले तरी तिही राष्ट्रभक्तीच होऊ शकते ना! प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की, हा देश माझा आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे. आपल्या या सुंदर निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे आता काळाची गरज असून, त्यासाठी कार्य करणे म्हणजे खरीखुरी राष्ट्रभक्ती होईल-असे मला वाटते.
 
श्री राजीव तारु 
अध्यापक, नू.म.वि.मुलांची प्रशाला
Powered By Sangraha 9.0