स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे. जो प्रत्येक भारतीयांच्या नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात, ‘पराधीन सपने हुं सुख नाही’ म्हणजे, गुलामगिरीमध्ये तर कोणासाठीही अभिशाप आहे. जगात आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडाही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरणं आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडादेखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. भारतवर्षातील महान संविधानाचे लेखक डॉ. भीमराव आंबेडकर यांनी संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रतेची ओळख करून दिली आहे. तसेच त्यांना विशेष अधिकारदेखील दिले आहेत.
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्धीच्या उंचावर पोहोचला आहे. आज संपूर्ण जगभरात, भारत आशेचा किरण होऊन सूर्यासम आकाशात चमकत आहे. पण आम्हांला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. यासाठी देशातील सर्व शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले आहेत. आम्हांला त्यांचे नेहमीच आभार मानायला हवेत. आज आपण या स्वतंत्रतेच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. हे आपल्याला भारतमातेच्या वीर सपूतांची आठवण करून देते. ज्यांनी आपल्या स्वत:ला पूर्णपणे या देशासाठी अपर्ण केले होते. भारतवर्षाला पूर्वीसारखे, सुवर्ण पक्ष्यासारखे तयार आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, तरच आपला देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून समोर येर्ईल.
हेच आमचे उद्दिष्ट्य आहे.
भारत मातेचा विजय असो. आम्ही सर्व एक आहोत. वंदे मातरम् !
- माही सचिन आवळे,
कन्याशाळा वार्ई,