देशभक्ती म्हणजे काय?

28 Aug 2023 13:07:29

देशभक्ती म्हणजे काय?
देशभक्ती म्हणजे काय?
प्रश्‍न पडला होता मला
खूप प्रयत्न केले मी
आज तो मला उलगडला
देशभक्ती म्हणजे नुसती
सीमेवर करायची रक्षा नव्हे
देशभक्ती साठी मनात
देशाविषयी प्रेम हवे
देशभक्ती म्हणजे आपल्या
देशाचे नाव उंचावणे
देशभक्ती म्हणजे कला, खेळ,
विज्ञानातून देशाचे गौरव करणे
खरी देशभक्ती म्हणजे
व्रत आहे ऐक्याचे
अशी देशभक्ती केल्यास
सार्थक होईल जन्माचे
- श्रध्दा रामेश्‍वरजी शर्मा,
श्री सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव
Powered By Sangraha 9.0