चला, बागेत जाऊ!

चला, बागेत जाऊ!

शिक्षण विवेक    04-Aug-2023
Total Views |
चला, बागेत जाऊ!
“चल उदर, आपण बागेत जाऊ.”
“चल अभर. मी तरार आहे. निघू रा.”
“वा! किती छान बाग आहे! हिरवी हिरवी झाडं, थंडगार वारा, रंगीतरंगीत फुलं, मंदमंद सुगंध... कसं ताजतवान वाटतं.” उदरला बगिचा खूप आवडला. खूप आनंद झाला.
“अभर, आपण धावू, खेळू, पळू, मजा करू! चल एक, दोन, तीन....रेडी ऽ”, उदरने टाळी वाजवली.
“घसरगुंडीवरून घसरू. गोल गोल फिरू.” दोघंही गाऊ लागले. नाचू लागले. मजा करू लागले.
“उदर... तूं थकला कां रे?”, अभरने आपुलकीने विचारले.
“नाही रे अभर! बागेत किती छान वाटलं. ताज ताज वाटतं. आनंद वाटतो!”, उदर खूप खूश होता.
“उदर बघ. फुलाफुलावर बसणारे फुलपाखरं,
डुगुडूगू चालणारे बदक, आकाशात उडणारे पक्षी, चिवचिव चिमणी, हिरवा हिरवा पोपट... किती छान आहे!” अभर एक एक दाखवत होता.
तर उदर बडबडत होता....
“झुळझुळ वारा गाणारा,
पक्षी बघा ऊडणारा...
रंगीबिरंगी फुलेच फुले,
खेळू बागडू सानुली मुले....”
“अरे उदर, ही कविता झाली. किती छान कविता केली. आता माझी ऐक”, लगेच अभरने सुरुवात केली.
“झाड माझा सखा, झाड माझं जीवन
बागेत रा सुंदर, रमलं माझं मन....”
“अरे अभर, तुझी कविता किती सुंदर आहे. उदरला अभरची कविता भारी आवडली.”
“अभर, मी ठरवलंर... आपणही झाडं लावारची...! झाडांमुळे ताजी हवा मिळते. जीवनवारू मिळतो. वातावरण थंड राहतं.” उदरने मनातले सांगितले
“चल उदर?”
“कुठे रे?”, उदरने विचारले.
“अरे चल... ती बघ, वाटिका आहे. तिथे इवली इवली रोपं मिळतात. ती घरी नेऊ आणि झाडं लावू. घरी बाग तरार करू.”, अभरने वाटिका दाखविली.
“अरे जवळ आहे. चल.”, अभर उदर वाटिकेकडे चालू लागले.
गुलाब, मोगरा, अबोली, सदाफुली, शेवंती, तुळस ही झाडं मी आईसाठी घेणार आहे. मलाही फुलझाडं खूप आवडतात.
उदरने फुलझाडं घेतली. पेरू, सफरचंद, डाळींब, लिंबू, कढीलिंब, वांगे, टोमॅटो ही झाडं मी लावणार आहे. मागे मोठ अंगण आहे. अंगण कसं हिरवंगार दिसेल. घरी बाग असली की भरपूर प्रमाणात प्राणवारू मिळतो. अभरने फळझाडं घेतली.
उदरने फुलझाडं घेतली. अभरने फळझाडं घेतली. दोघंही आनंदात चालू लागले.
झाड माझा सखा
झाड माझं जीवन.
झाड माझ गाणं
झाड माझ जिणं
दोघंही गुणगुणत होते.आनंदात गात होते .
खुशीखुशीत घराकडे चालले होते.
- मीना खोंड