माझा भारत माझा अभिमान.

07 Aug 2023 12:42:48
माझा भारत माझा अभिमान
   राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्या राष्ट्रावर असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम. आपला भारत हा विविध रूढी, परंपरा, पोषाख, भाषा तसेच विविध लोक त्यांच्या कला, नृत्य, शिल्प या कलांनी नटलेला आहे. आपल्या भारताचे जवान 24 तास दिवसरात्र आपल्या भारतीयांसाठी लढत असतात व आपले रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आज आपण रात्री सुखाने बिनधास्त झोपू शकतो व आरामात जीवन जगू शकतो. पण कधीतरी आपण त्या जवानांचा विचार केलाय का? भारतीय जवान आपल्यासाठी दिवसरात्र आपले रक्षण करतात. त्यांच्यामुळे आपले जीवन आरामात आहे. पण त्यांचे जीवन किती जोखमीचे आहे! आपल्याला जरी हातात बंदुक घेऊन लढता नाही आलं, तरी आपण हातात झाडू घेऊन देशाची स्वच्छता तर नक्कीच करु शकतो. स्वच्छता हा पण एक राष्ट्रभक्तीचा भाग आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच मोठमोठे व्यक्ती जर हातात झाडू घेऊन साफसफाई, देशाची स्वच्छता करत असतील तर आपलयाला त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. आपणही या भारताचे नागरिक आहोत, या देशाचा भाग आहोत. आपला देश स्वच्छ राहावा ही आपली जबाबदारी आहे...माझा भारत माझा अभिमान.
 
श्रावणी कालिदास रांजवण
श्री. सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालय,माजलगाव.
Powered By Sangraha 9.0