दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये शिक्षणविवेकचा वर्धापनदिन उत्साहामध्ये पार पडला

09 Aug 2023 15:41:14

शिक्षणविवेकचा वर्धापनदिन
 
दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये शिक्षणविवेकचा वर्धापनदिन उत्साहामध्ये पार पडला. शिक्षणविवेकच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने काही खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थिनींना कवी व त्यांचे कवितासंग्रह यांची ओळख व्हावी यासाठी शाळेच्या आवारामध्ये एक छोटेसे प्रदर्शन वर्धापनदिनाच्यानिमित्ताने लावण्यात आले होते. सर्व विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाला भेट देऊन कवी व त्यांचे कवितासंग्रह याची माहिती घेतली; तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी शिक्षणविवेक वर्धापनदिन व क्रांतिदिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये क्रांतिकारकांचे महान कार्य विद्यार्थ्यांनी समोर सादर केले व शिक्षणविवेकचा वर्धापनदिन साजरा केला.
 
Powered By Sangraha 9.0