पुणे: टिळक रोड येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेतील सकाळ व दुपार विभागाच्या वतीने १४ सप्टेंबर हा ‘हिंदी दिवस’ साजरा करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शोभा पैठणकर, शैलेश भालचंद्र जोशी, मुख्याध्यापिका ज्योती बोधे,पर्यवेक्षिका व हिंदी विभाग प्रमुख सरिता स्वादी, लक्ष्मी मालेपाटी, हिंदी विषयाच्या शिक्षिका विद्या सोळसे, विजया जगताप, शीतल शिंदे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी सकाळ व दुपार विभागात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी गणेश वंदना, नृत्य गीत सादर केले. या वेळी प्रमुख पाहुण्या शोभा पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हिंदी दिवसाचे महत्व सांगितले. शिवाय सर्व कार्यक्षेत्रामध्ये हिंदी भाषा उपयोगी असल्याचे प्रतिपादन केले. दुपार विभागाच्या कार्यक्रमात शैलेश जोशी यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगून ‘भाषा आणि हस्ताक्षर' याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया जगताप, शितल शिंदे यांनी केले. हिंदी दिवसाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमृत महोत्सवा निमित्त सकाळ व दुपार भागात देशभक्ती गीतांचे सादरीकरणही करण्यात आले, हे विशेष. सकाळ विभागात हिंदी दिवसानिमित्त देशभक्ती गीतांचे सादरीकरणकरण्यात आले. या वेळी हिंदी साहित्यिकांच्या कवितांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी हिंदी दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले. दुपार विभागात देशभक्ती गीतांचे सादरीकरण झाले. तसेच मैथिली शरण गुप्त लिखित पंचवटी महाकाव्याचे वाचन केले. सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ द्वारा लिखित ‘राम की शक्ति पूजा’या महाकाव्याचे अर्थासहित वाचन केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण केले. याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी ‘हिंदी भाषा का विश्व में स्थान’ तर आठवीतील विद्यार्थ्यांनी ‘स्वातंत्र्य लढ्याची भाषा हिंदी ’ या विषयावर सादरीकरण केले. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘दिनदर्शिकाचे’ प्रकाशन शैलेश जोशी हस्ते करण्यात आले. या वेळी हिंदी कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांनी त्यांच्या कथांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रीरंग अभ्यंकर व इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अवनी जोशी(सकाळ विभाग) इयत्ता नववीचे विद्यार्थी गार्गी, निखिल, स्वयेश्री, तनुश्री, नील, सुजन डांगे (दुपार विभाग) यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजया जगताप, प्राची कुलकर्णी तर विद्या सोळसे, शितल शिंदे यांनी आभार मानले. 'हिंदी हमारी आन है, हिंदी हमारी शान है, हिंदी, हमारी चेतना वाणी का शुभ वरदान है’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ व दुपार विभागाच्या पर्यवेक्षिका, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.