कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळेमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न

15 Sep 2023 17:28:26
 
कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळेमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळेमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा प्रशालेची माजी विद्यार्थिनी कुमारी मनाली जाधव हिच्या मार्गदर्शनाखाली ही संपन्न झाली. प्रशालेतील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्तम प्रतिसाद नोंदविला. प्रशालाचे हे बारावे वर्ष असून गेली अकरा वर्षे प्रशाला उत्तम पद्धतीने ही कार्यशाळा राबवित आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. श्रुती बागेवाडी यांचे उत्तम प्रोत्साहन विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळते. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या कला शिक्षिका सौ.मधुरा देशपांडे ,प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ सुस्मिता तड्कासे,पालिका सौ. अभिंजली जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0