मी केलेली मदत

15 Sep 2023 13:17:51

मी केलेली मदत
आईने शिकवले आहे की, नेहमी लोकांची मदत करावी, मी नेहमी गरजू लोकांना मदत करते. एक किस्सा आठवत आहे.
मी एकदा बाजारात सामान आणायला गेले होते. चालत घरी येताना माझ्या पुढे एक आजी चालत होत्या. त्यांच्या हातात दोन जड पिशव्या होत्या आणि त्या थांबतथांबत चालत होत्या. मला त्यांचा त्रास पाहावला नाही. मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. आजी हसल्या आणि एक पिशवी त्यांनी मझ्याजवळ दिली. आम्ही दोघी गप्पा मारत त्यांच्या घरी पोहोचलो. मी पिशवी त्यांना दिली आणि घरी जायला निघणार तेवढ्यात आजीने थांबवले आणि मला खाऊ दिला. त्यांनी माझे आभारही मानले. मी घरी जाऊन आईला ही गोष्ट सांगितली. आईने मला शाब्बासकी दिली.
- स्नेहा आंबर्ले
अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द
Powered By Sangraha 9.0