पाणीपुरी आंबट गोड,
करण्यासाठी आधी चिंचा फोड.
चिंच पाण्यात भिजत टाक,
त्यात थोडा गुळही टाक.
त्यात टाक तिखट मीठ,
सर्व काही मिसळ नीट.
आता पुरी बनवू या,
त्यासाठी पीठ मळू या.
पीठ लाटणावर ठेवू,
छोट्या छोट्या पुर्या लाटू.
पुर्या तेलात तळून घेऊ,
पाणीपुरी मिळून खाऊ.
- अस्मिता टाकळकर,
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगांव