कोबीची कोशिंबीर

25 Sep 2023 12:11:45
 
कोबीची कोशिंबीर
 
कोबीची कोशिंबीर :
साहित्य : 1 कप बारीक चिरलेला हिरवा कोबी, अर्धा कप किसलेला गाजर, दीड कप ढब्बू मिरचीचे तुकडे, थोडे बेदाणे, दीड चमचा ओल्या नारळाचा खव, अर्धा चमचा भाजलेल्या तिळाची पूड, लिंबाचा रस, मीठ हे सर्व एकत्र करून हलकेच हलवणे.
कोबी आणि भिजलेल्या शेंगदाण्याची कोशिंबीर:
साहित्र : दीड कप हिरवा चिरलेला कोबी, अर्धा कप 2 तास भिजवलेले शेंगदाणे, 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या जाडसर वाटून, लिंबाचा रस, 1 चमचा तिळांच तेल (कच्चं). सर्व एकत्र करून हलकेच हलवणे.
कोबीचं रायतं :
साहित्य : 1 कप किसलेला कोबी, 1 कप घुसळलेले दही, पाव चमचा मोहोरी पूड किंवा वाटलेला पुदिना, मीठ, हिरवी मिरची (चिरून), 1 चमचा भिजवून वाटलेली हरभरा डाळ, 1 चमचा तेलाची फोडणी (ऐच्छिक). सर्व एकत्र कालवणे. भाज्यांची वेगवेगळी मिश्रणं वापरून कोशिंबीर करता रेईल; पण अ‍ॅसिडिटी असेल तर कांद्याचा वापर कमी असावा आणि कर्करोग प्रतिबंधासाठी भरपूर कांदा वापरणे फारद्यांचं ठरेल.
- श्रेया जोगावडे, 
विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे
Powered By Sangraha 9.0