रव्याचे बॉल्स

30 Sep 2023 10:00:56

रव्याचे बॉल्स
साहित्य : रवा, तेल, पाणी, मीठ, जिरे, पांढरे तिळ, कडिपत्ता, धणेपूड, लाल तिखट, हळद, हिंग, सांबर मसाला, लिंबू
कृती : एक चमचा तेल घालून, त्यात 2 कप पाणी घालून, चवी नुसार मीठ घालावे. पाणी उकळल्यानंतर हळू हळू रवा घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट करून वाफलवून घ्या. मिश्रण ताटात काढून, तेलात मळावे. त्याचे लहान बॉल्स बनवून वाफलावे.
फोडणी : कढईमध्ये एक चमचा तेल घालून जिरे, 1 चमचा पांढरे तिळ, 5-6 कडिपत्ता, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, हिंग, 1 चमचा सांबर मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करणे. फोडणी परतल्यानंतर अर्धा लिंबू पिळून, त्यामध्ये बॉल्स 5-6 मिनिटे परतून घ्या. मग तयार आहेत. कुरकुरीत खुसखुशीत रव्याचे बॉल्स.
- शौर्या बोडसे,
कन्याशाळा, सातारा
Powered By Sangraha 9.0