क्रांतिकारक म्हणजे...

05 Sep 2023 13:51:53

क्रांतिकारक म्हणजे...
क्रांतिकारक म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे म्हणजे क्रांतिकारक. एवढेच नव्हे, तर जेव्हा भारत देश इंग्रजाच्या ताब्यात होता. तेव्हा ज्या ज्या लोकांनी इंग्रजाच्या ताब्यातून भारताला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. रामध्ये एक होते. त्यांचे नाव भगतसिंग त्यांचे एकच लक्ष होते. ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. खूप प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. १९२८ मध्ये सायमन कमिशनर या ब्रिटिश शिष्टमंडळाला विरोध केल्यानंतर, करण्यात आलेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय यांचा अंत झाला.
लाला लजपतराय यांचा बदला घेण्यासाठी भगतसिंगने त्यांच्या सोबत अजून दोन जणांना शामिल केले. त्यांचे नाव राजगुरु आणि सुखदेव. लाला लजपतराय यांच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या सँडर्स या अधिकार्‍याला भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी निरोजनबद्ध रित्या गोळ्या झाडल्या. इंग्रज सरकारने या तिघांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि फितूरीमुळे ते पकडले गेले आणि २३ मार्च १९३० रोजी या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.
आपल्या देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. यालाच क्रांतिकारक म्हणतात.
जर हिंद!
- योगेश धूत, 9 वी,
श्री. सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव
Powered By Sangraha 9.0