स्ट्रॉची बासरी

स्ट्रॉची बासरी

शिक्षण विवेक    07-Sep-2023
Total Views |

स्ट्रॉची बासरी
माझ्या छोट्या दोस्तांनो, आताच नवरात्री, दसरा हे सण आपण साजरे केले. सगळीकडे मंगलमय, उत्साहचं वातावरण होतं. होय ना? तुमच्यापैकी खूप जण रावणदहन बघायला गेले असणार. जत्रेत पण फिरला असाल. त्यात तुम्ही खेळणे विकणार्‍या फेरीवाल्याजवळ पिपाणी (पुंगी) बघितली असणार. पण जर ही घेऊन दिली आणि ती वाजवून तुम्ही मोठ्यांचं डोकं उठवलं तर? म्हणून कोणी तुम्हाला ही घेऊन पण दिली नसणार. पण हीच पिपाणी आपल्याला घरी करता आली तर? आता तुम्ही म्हणणार हे कसं काय? तर अगदी सोप्प आहे. चार ते पाच लांब स्ट्रॉ कुठूनतरी घेऊन या. त्या स्ट्रॉच्या एका टोकाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्ही आकारात कापून घ्या. झाली तुमची पूंगी तयार. आता वेगवेगळ्या स्ट्राँना वेगवेगळ्या आकारात कापलं की, त्यातून वेगवेगळे आवाज येणार बरं का! स्ट्रॉ ओठात न पकडता थोडासा आत टाका आणि पूंगी वाजवून बघा. एक मोठा स्ट्रॉ वाजवता वाजवता कात्रीने कापत न्या. बघा कसा मजेदार आवाज येतो ते.
- शरयु श्रीगडीवार