दिनांक ०४ सप्टेंबर ते ०६ सप्टेंबर या कालावधीमध्ये स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे 'शिक्षणविवेक' आयोजित 'आंतरशालेय पपेट सादरीकरण' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण १५७ गट सहभागी झाले होते. पूर्वप्राथमिक ते माध्यमिक आणि शिक्षक, पालक अशा गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी कार्टूनच्या गोष्टी हा विषय देण्यात आला होता. पपेटच्या माध्यमातून मुलांनी वेगळ्या वेगळ्या विषयांवरच्या गोष्टी सादर केल्या.