ज्वारीचे नुड्ल्स
साहित्य : नुड्ल्ससाठी : ज्वारीचे पीठ, ओवा, मीठ, हिंग, हळद
फोडणीसाठी : तेल, जीरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची,
कडीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे
कृती : प्रथम ज्वारीच्या पिठात ओवा, मीठ, हिंग, हळद, पाणी घालून घट्ट मळून घेणे. नंतर सोर्याला शेवेची ताटली लावून चाळणीवर नुड्ल्स टाकावे. हे नुड्ल्स पाण्यावर वाफवून घ्यावेत. नुड्ल्स गार करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल घेऊन जीरं, मोहरी, कडीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये वाफवलेले नुड्ल्स घालून परतून घ्यावे. तळलेले शेंगदाणे घालावेत. 2-3 मी. मंदाअचेवर ठेवावे. वरून कोथिंबीर आणि शेव घालून, लिंबासोबत डीश सर्व्ह करावी.
- विराज शिंदे