मुक्ता सन्मान प्राप्त धृवी

25 Jan 2024 16:54:18

मुक्ता सन्मान प्राप्त धृवी
 
ध्रुवी (परी) ही वयाच्या ४थ्या वर्षापासून सह्याद्रीत ट्रेकिंग व क्लाईंबींग करते. तिने वयाच्या 4थ्या वर्षी आशिया खंडातील दुसर्‍या नंबरची मोठी दरी पार केली व १०० फूट रॅपलींगही केले. वयाच्या ५व्या वर्षी कळसुबाई शिखर सर करून त्यावर संविधान वाचले, त्याची नोंद हायरेंज ऑफ बुक यात झाली आहे.
त्यानंतर तानाजी सिनेमा पाहून सिंहगडावरील (द्रोणागिरी) तानाजी कडा सर केला. त्यानंतर हिमालयातील (१५४२०) असणारे फ्रेंडशिप पिक वर चढाई केली, तिने १५००० फूट यशस्वी चढाई केली.
ध्रुवीने वजीर सुळका, डांग्या सुळका, तैलबैलाची भिंत (पुढील व मंदीरा मागील) दोन्ही बाजूने, ड्यूकनोज (नागफणी), कळकराई, वानरलिंगी या सुळक्यांवर चढाई केली आहे. बदामी येथील फिंगर लूप ६सी) तिने लीड क्लाईंबींग केला. जीवधन ते वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंगही तिने केले आहे.
सिंहगड, तोरणा, पुरंदर, वज्रगड, तुंग, तिकोना, राजगड, रायगड, शिवनेरी, जीवधन, रतनगड, लोहगड, विसापूर या किल्ल्यांवर चढाई केली. ध्रुवी राजे शिवाजी क्लाईंबींग वॉलवर रोज सराव करते, तिला स्पोर्ट क्लाईंबींग या खेळात ओपन नॅशनल व राज्यस्तरीय पातळीवर विविध स्पर्धेत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदके मिळाली आहेत. या सगळ्याची नोंद घेऊन न्यूज १८ लोकमतने मुक्ता सन्मान २०२३ हा पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0