शिक्षण माझा वसा २०२४ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा सांगलीत संपन्न

29 Jan 2024 12:13:47
 
शिक्षण माझा वसा २०२४ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा सांगलीत संपन्न
 शिक्षण माझा वसा २०२४ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा सांगलीत संपन्न
शिक्षणविवेक आणि लुल्ला फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण माझा वसा २०२४ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा रविवार, दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सांगलीमधील भावे नाट्य मंदिर येथे ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. ह.भ. मोहनबुवा रामदासी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दासबोध पूजनाने झाली. यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी शिक्षण माझा वसा या पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षण विवेक आणि लुल्ला फाऊंडेशन यांची माहिती देणार्‍या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या. यानंतर  खालील पुरस्कारथ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  भाषा विभाग - मनिषा सोनवणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी), गणित विभाग - आस्मा नदाफ अल अमिन (मराठी प्रायमरी स्कूल, सांगली), तंत्रज्ञान विभाग - संतोष सुतार (जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागपूर), कला विभाग - स्नेहल भोर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झित्राईमळा, खेड), विशेष - संदीप कोल्हे (जि. प. प्राथमिक शाळा सुकळी केंद्र, कोठा), यांना  जिल्हा परिषद शाळा पुरस्कारांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले. तसेच शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संस्था - सूर्यकांत खैरनार, मएसो वाघिरे विद्यालय, सासवड, छत्रपती शिक्षण मंडळ संस्था - प्रज्ञा घनघाव, प्राथमिक विद्यामंदिर, काटेमानिवली, डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्था - स्वाती यादव, नवीन मराठी शाळा, पुणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था - रुपाली घुगरे, जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळा, सातारा, शिक्षण प्रसारक मंडळी संस्था - मधुरा देशपांडे, वि.मो. मेहता माध्यमिक शाळा, सोलापूर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था - श्रुती देशपांडे, कै. नाना पालकर प्राथमिक शाळा, नांदेड, मुख्याध्यापक - रोहिदास भारमळ, सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार देत असतानाच पुरस्कार्थीवरील चित्रफित दाखवली गेली, तसेच शिक्षकाच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान 'सामर्थ्य आहे चळवळीचे' या उपक्रमातील मुलांनी विविध बोधपर गुणदर्शन सादरीकरणे केली. कार्यक्रमासाठी ज्यांचे सहाय्य झाले त्या सर्वांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख अतिथी स. भ. मोहनबुवा रामदासी यांचे व्याख्यान झाले. यामध्ये मोहनबुवांनी समर्थ रामदास आणि छ. शिवाजी महाराज यांच्या आठवणी सांगितल्या. स. भ. मोहनबुवा रामदासी म्हणाले, "समर्थ रामदास यांची शिकवण शालेय उपक्रमांमध्ये समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे." पुरस्कार सोहळ्याची सांगता 'कल्याण करी रामराया' या प्रार्थनेने झाली.
Powered By Sangraha 9.0