आज बुधवार, दि.११ डिसेंबर रोजी म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे दुपारी १२ ते १ या वेळेमध्ये एक तास वाचन करून घेण्यात आले. यामध्ये प्रशालेतील पदाधिकारी,विद्यार्थी , शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशालेतून विविध पुस्तकांचे वाचनासाठी वाटप करण्यात आले. एक तास सर्वांनी पुस्तकांचे अतिशय शांतपणे आणि व्यवस्थितरित्या वाचन केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबतच प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे,उपमुख्याध्यापक श्री.चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इ. ५ वी ते १० वी चे सर्व विद्यार्थी यांनी या पुस्तकांचे वाचन करून उपक्रमात सहभाग घेतला.