धमाल धावपळ

01 Feb 2024 15:26:17


धमाल धावपळ

धमाल धावपळ
मी धावतो पाखरांमागे
कधी फुलपाखरांमागे
असलं कळेना कसलं
पळण्याचे वेड लागे

सारे माळरान माझे
पान न पान माझे
गाव इतके सुंदर
त्याचे आम्हीच राजे

कधी डोंगर कधी शेत
कधी रानमेव्याचा बेत
धमाल पळत सुटायचं
वारं अंगावरती घेत

नदीत धपकन उडी
अंग भिजेलशी बुडी
सुकवण्या उघडे अंग
मग झाडामागे दडी

त्या तिथल्या काठावर
भोलेशंकर घाटावर
तिथे ठेवितो माथा
अन लक्ष प्रसादावर

अशी धमाल धावपळ
दिवस जातो खुशीत
जीव जातो दमून
रात्री आईच्या कुशीत
- ईशान पुणेकर
Powered By Sangraha 9.0