आई!

05 Feb 2024 12:29:02


आई! 

आई!
आई म्हणजे आत्मा
आई म्हणजे ईश्वर
काय सांगावी आईची ख्याती
मायेने जवळ घेऊन प्रेमाची ऊब देणारी
वेळ पडेल तेव्हा रागाने बोलणारी
वेळ पडेल तेव्हा कठोरपणे वागणारी
आणि वेेळ पडेल तेव्हा आपल्यासाठी
जगाशी झुंज देणारी.

अरे आपण जन्मही घेतला नसेल तेव्हापासून
आपल्यासाठी जीवाचे रान करणारी स्त्री म्हणजे आईच
असू शकते.
आई आपल्याला नऊ महिने पोटात ठेवते,
अरे आपला जन्मच तिला त्रास देणार असतो
पण तेच तिच्यासाठी सर्वात मोठे सुख असते.
आपल्यासाठी ती तिचे काळीज काढून द्यायला तयार
असते.
जन्मल्यानंतर आपला रडलेला आवाज तिला आनंद
देतो; पण नंतर तोच रडलेला आवाज तिला त्रास
देतो; पण आईसाठी आपण कितीही करू, तिने केलेल्या
त्यागापुढे तिच्या मारलेल्या इच्छा आकांक्षांपुढे हे
जग जरी तिच्या मुठीत आणून दिले
तरी ते कमीच पडणारे असेल.
आपल्या जीवनातील आईचे स्थान
कोणीच घेऊ शकत नाही.
- आकांक्षा खेलबुडे, १० वी,
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव .
Powered By Sangraha 9.0