सारसबाग गणपती मंदिर

06 Feb 2024 12:52:03

 
सारसबाग गणपती मंदिर
सारसबाग गणपती मंदिर
‘सारसबाग गणपती मंदिर’ श्रीमंत नानसाहेब पेशवे यांचे पूजास्थान म्हणून ओळखले जाते. नानासाहेब पेशवे यांच्या काळात पर्वती पायथ्याला एक कृत्रीम तलाव बांधण्यात आला. तसेच त्या ठिकाणी एक मंदिर आणि सभोवताली एक बांधकाम करण्यात आले. या मंदिराची रचना अशी केली आहे की, दूर रस्त्यावरून जरी पाहिले तरी गणरायाच्या मूर्तीचे दर्शन होते.
सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला ‘सारसबाग’ असे नाव दिले आहे. या परिसरात तलावाजवळ अनेक विविध रंगाचे, जातीचे प्राणी, पक्षी येत असत. उदा: सारस नावाचे पक्षी खूप दिसायचे; त्यामुळे या बागेला सारसबाग हे नाव देण्यात आले. आजही या तलावात मासे, कासव, कमळं बघायला मिळतात. आजही या मंदिराचे आणि बागेचे सर्वांना आकर्षण वाटते. हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरातील गजाननाची मूर्ती ही श्री. सिद्धिविनायकाची आहे. ही मूर्ती अतिशय सुबक, सुंदर पांढर्‍या रंगात आहे. हे मंदिर ३००वर्ष जुने असून मंदिर परिसरातच एक संग्रहालय आहे. तिथे गणपतीच्या विविध मूर्ती बघायला मिळतात.
मला ही बाग खूप आवडते आणि गणपतीबाप्पा पण खूप आवडतो. मी नेहमी आई, बाबा आणि मत्रिणींसोबत जात असते. एक दिवस मी माझ्या मैत्रिणींसोबत पूर्णवेळ मंदिरात घालवला. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन संग्रहालय बघितले आणि बागेमध्ये भरपूर मजा केली. तो दिवस आठवला की, खूप छान वाटते.
- सानवी वनारसे, ३ री
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नर्‍हे
Powered By Sangraha 9.0