रमणबागेतील विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांकडून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

06 Feb 2024 12:54:06

रमणबागेतील विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांकडून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
 
रमणबागेतील विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांकडून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे 
शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी अग्निशामक दलाचे 'आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिक' दाखवण्यात आले.
श्री.गजानन पाथ्रूडकर (पुणे महानगरपालिका अग्निशामक विभाग) त्यांच्या सहकार्यांनी आग विझवणे व आगीपासून बचाव करणे या अनुषंगाने चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवली.आग लागणे, पूर येणे,रस्त्यावर ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणारा टॅंकर उलटणे, वाहनांना आग लागणे,मांज्यांमध्ये पक्षी अडकणे अशा विविध आपत्तींच्या प्रसंगी सामान्य नागरिकांनी सजग राहून स्वतःचा इतरांचा बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.प्रशालेच्या शालाप्रमुख मा.श्रीम.मनिषा मिनोचा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा जक्का यांनी केले.वंदना थोरात यांनी अतिथींचा परिचय करून दिला.गणेश देशमुख यांनी आभार मानले.कार्यक्रमास पदाधिकारी सुरेश वरगंटीवार,जयंत टोले,उषादेवी भोसले सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0