आंतरशालेय क्रीडा महोत्सवात नवीन मराठी शाळेस जनरल चॅम्पियनशिप

08 Feb 2024 11:16:30
 
आंतरशालेय क्रीडा महोत्सवात नवीन मराठी शाळेस जनरल चॅम्पियनशिप
आंतरशालेय क्रीडा महोत्सवात नवीन मराठी शाळेस जनरल चॅम्पियनशिप
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्यातर्फे प्राथमिक विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवामध्ये नवीन मराठी शाळा सातारच्या खेळाडूंनी भरघोस बक्षीसे मिळवत जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली.
दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूल सातारा कोटेश्वर मैदानावर संपन्न झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेती मल्लखांबपटू प्रतिक्षा मोरे यांच्या हस्ते झाले. या क्रीडा महोत्सवामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा, वाई, सांगली येथील प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला होता. ६० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, रिंग उचलणे, अडथळा शर्यत या खेळांच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच लंगडी पळती, डॉजबॉल, गोल खो-खो या सांघिक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेने लंगडी पळती मुले, डॉजबॉल मुली, गोल खो खो मुले या सामन्यांचे विजेते पद पटकावले व लंगडी पळती मुलीं चा संघ उपविजेता झाला. सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मा. श्री. किशोर शिंदे यांचा हस्ते या महोत्सवाचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी डे.ए.सो च्या क्रीडा समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, शाला समिती अध्यक्ष सारंग कोल्हापुरे, सदस्य अमित कुलकर्णी, डे.ए.सो. चे विश्वस्त अनंत जोशी शालाप्रमुख सौ. हेमा जाधव क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शबनम तरडे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. क्रीडा विभाग प्रमुख म्हणून मंगल साळुंखे यांनी काम पाहिले. या क्रीडा महोत्सवासाठी  मनिषा चव्हाण, सीमा घाटगे, मनिषा मोरे, सारिका लामकाने, गणेश बाबर, प्रकाश राऊत यांचे सहकार्य लाभले. शाळेला मिळालेल्या जनरल चॅम्पियनशिपचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला.
शब्दांकन - सौ.मनिषा मोरे, उपशिक्षिका
नवीन मराठी शाळा, सातारा
Powered By Sangraha 9.0