शिक्षणविवेक अंकाचे विमोचन

11 Mar 2024 18:25:24
 
 शिक्षणविवेक अंकाचे विमोचन
   श्री. खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभाग अंबाजोगाई येथे शिक्षणविवेक अंकाचे विमोचन. दि.9/3/24 वार शनिवार रोजी श्री खोलेश्र्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभाग अंबाजोगाई येथे शिक्षणविवेकच्या मार्च महिन्याच्या अंकाचे विमोचन सर्व शिक्षक सहकारी व प्रगती विभाग प्रमुख सौ.वर्षाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या महिन्याच्या अंकात मा.मुख्याध्यापक श्री. अप्पाराव यादव सर यांच्या विषयी शिक्षणविवेक प्रमुख सौ.आकनगिरे बाई यांनी लिहिलेला लेख प्रकाशित करण्यात आला त्याबद्दल सर्व शिक्षक सहकारी व मा.मुख्याध्यापक यादव सर,विभाग प्रमुख सौ .वर्षाताई मुंडे या सर्वांनी त्यांचे कौतुक केले व दरमहा इतर शिक्षकांनी पण लिहिते व्हावे यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात मार्च महिन्याच्या अंकाचे विमोचन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0