प्रगतीची पाऊलवाट

19 Mar 2024 15:15:50

 
प्रगतीची पाऊलवाट

प्रगतीची पाऊलवाट

पाऊलवाट, आयुष्यातील प्रगतीची पाऊलवाट. आयुष्यात पाऊलवाटेवरून चालणे खूप महत्त्वाचे असते. आपल्यासमोर दोन वाटा असतात. एक आपल्याला चांगल्याकडे घेऊन जाणारी असते, तर दुसरी आपल्याला वाईटाकडे घेऊन जाणारी असते. आपल्याला कोणत्या वाटेवरून चालायचे हे आपल्या हातात असते.

छोट्या पाऊलवाटेपासून यशाकडे जायचे की, मोठया रस्त्याने वाईट गोष्टींकडे जायचे? आयुष्यात यशाच्या पाऊलवाटेवरून चालताना पहिले पाऊल हे अपयशाचेच असेल, तसेच दुसरेही पाऊल अपयशाचे असेल, अशी

अनेक अपयशाची पाऊलं असतील. पण शेवटी एकतरी यशाचे पाऊल असेल, या विश्वासाने अपयशाच्या वाटेवरून चालत, यशाच्या शोधात इकडे तिकडे न वळता चालणे हे आपले कर्तव्य असते. वाटेत चालताना अपयश आल्यावर त्याला न घाबरता उरलेल्या यशाच्या वाटेवरून चालणे म्हणजेच आयुष्यातील प्रगतीच्या पाऊलवाटेवरून चालणे. आपल्याला सतत अपयश येत असेल, तर यश हे एक दिवस आपलेच होणार या विश्वासाने प्रगतीच्या पाऊलवाटेवरून चालायला शिका.

- श्रावणी कालिदास रांजवण,
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव.

Powered By Sangraha 9.0