माझे आजोबा माझा आदर्श

21 Mar 2024 14:23:10

माझे आजाेबा - माझा आदर्श
मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा, शाळेतील शिक्षकांचा महत्वाचा वाटा असताे. तसेच  माझ्या जडणघडणीमध्ये माझे आदर्श असणारे थाेर व्यक्तीमत्व म्हणजे माझे आजाेबा लक्ष्मण शामराव तांबे. आजाेबांचा जन्म ७ जुलै १९४५ राेजी एका शेतकरी कुटुंबात झाला. आजाेबांचे शिक्षण जेमतेम चाैथीपर्यंत झाले. आजाेबांना माझ्या वडिलांसह तीन मुले व एक मुलगी आहे. आजाेबांचे शिक्षण जरी चाैथीपर्यंत झाले असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून स्वत: शेतीमध्ये कष्ट करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. मोठ्या काकांनी एस.एस्सी.,बी.एड. ही पदवी पूर्ण केली असून हायस्कूलमध्ये गणित विषयाचे शिक्षक आहेत. तसेच माझ्या लहान काकांनी मराठी विषयामध्ये पी.एचडी. पूर्ण केली असून  बी.एड. कॅालेजला प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. माझे वडीलही बी.ए.एल.एल.बी. असून शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिली करतात.
आजाेबांनी आपल्या  मुलांना नेहमीच शिक्षणासाठी प्राेत्साहित केले. त्यांचा स्वभाव अत्यंत शिस्तप्रिय व कठाेर हाेता, परंतु वेळेनुसार माणसाने आपल्यामध्ये कसे बदल घडवून आणावेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच माझे आजाेबा. छाेट्याशा खेडेगावात शेतकरी असलेले  आजाेबा आज माझ्याबरोबर पुण्यासारख्या शहरी भागातही आनंदाने जीवन जगतात. मला आजाेबांच्या आयुष्यातील त्यांचे अनुभव ऐकून अनेक गाेष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच तर मित्रांनो मला माझे आजाेबा खरे आदर्श व्यक्ती वाटतात.
- श्रेया श्रीकांत तांबे, 
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नऱ्हे.
Powered By Sangraha 9.0