शाळा...

19 Jun 2024 11:26:13


शाळा...   

प्रत्येक मुलाला घडवण्यात आई-बाबांचा जेवढा वाटा आहे; तितकाच वाटा शाळेचा असतो. त्याचप्रमाणे माझी शाळा मला घडवते. माझी शाळा गावातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे. एक दिवस शाळेत गेले नाही तरी मला करमत नाही. माझी शाळा खूप मोठी आहे. सगळ्या सुविधा आहेत. शाळेत प्रवेश करताना मोठ गेट आहे. डाव्या बाजूला मोठं मैदान आणि समोर मोठं पटांगण आहे. मैदान संपल्यावर लहान मुलांची शाळा आहे. दोन मजली दगडी इमारत आणि पाठीमागच्या बाजूला तीन मजली इमारत आहे. तिसऱ्या मजल्यावर कनिष्ठ महाविद्यालय आहे. मागे उजव्या बाजूला छोटा दरवाजा आहे. शाळा हे माझे आवडते ठिकाण आहे. मी माझे दिवसाचे पाच ते सहा तास शाळेत घालवते. माझ्या जीवनातील आतापर्यंतचे सर्वात चांगले अनुभव हे शाळेतूनच मिळाले. शाळेत गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. शाळेत प्लेग्रुपपासून ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. शिवाय इंग्लिश मिडियम सुद्धा आहे. या शाळेमुळे मला खूप काही शिकायला मिळत. शिवाय शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणीपण आहेत. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, टेक्निकल लॅब, अटल लॅब, मोठ स्टेज आणि मोठा हॉल त्यालाच आचार्य अत्रे भवन असे नाव आहे. अशा सुविधा आहेत. शाळेत दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मला दररोज शाळेत नवीन काहीतरी शिकायला मिळते. वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, तसेच वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या जातात. आमच्या शाळेची शिस्त खूप कडक आहे. गेटवर वॉचमन काका सुद्धा बसलेले असतात. त्याच तिथेच शाळेत उजव्या कोपऱ्यात घर आहे आणि त्या घराशेजारी शाळेची बाग आहे. पहिली ते चौथीच्या वर्गांची वेळ १२ ते ५ अशी आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गांची वेळ सकाळी ७ ते १२ अशी आहे आणि आठवी ते दहावीची १२ ते ५ अशी आहे. अकरावी व बारावीच्या वर्गांची वेळ सकाळी ८ ते १२.३० अशी आहे. दर वर्षी शाळेची सहल जाते. शाळेकडून स्नेहभोजन असते बक्षीस समारंभ असतो. शाळेतले शिक्षक खूप चांगले आहेत. ते खूप मार्गदर्शन करतात आम्हांला आणि आमच्या शाळेत व्यक्तिमत्व विकासकेंद्र पण आहे. आमचे वर्ग खूप मोठे आहेत. आणि शाळेत खूप जुनी आणि मोठी झाडे आहेत. मैदानावर खूप सारी झाडे आहेत. दर वर्षी शाळेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दिवस खूप उत्साहाने साजरे होतात. एप्रिल महिन्यात पेपर झाल्यावरसुद्धा माझ्या शाळेत वेगवेगळी शिबिरे राबवली जातात. मला माझी शाळा खूप आवडत्ो. जीवन झाली शाळा, अनुभव झाले गुरू, रोज नवीन शिकून, अध्ययन आहे सुरू.
 
- रिया भोंगळे 
Powered By Sangraha 9.0