हो खूपच सोपं आहे...

20 Jun 2024 12:02:59


हो खूपच सोपं आहे...

पर्यावरण म्हणजे काय रे भाऊपर्यावरण. म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरणम्हणजेफुलं, पान, झाडं, नदी, समुद्र आणि जे जे निसर्गात असतं, ते ते. पण मग ते प्रदूषण, प्रदूषण म्हणतात ते काय रे?

    प्रदूषण म्हणजे घाण. आपण काही गोष्टी घाण करतो. म्हणजे बघ हा.. आपण फुलं तोडतो, पानं तोडतो, झाडं तोडतो. नदीत, समुद्रात प्लास्टिकचे कपटे टाकतो. आणि घाण करतो. प्लास्टिकमुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होतंआता तर प्लास्टिक सगळीकडेच असतं. मगअरे, सोपं आहे. हे प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक जमा करणाऱ्या संस्थांकडे दिलं ना तरी प्रदूषण ५० टक्के कमी होईल.
   हं... असं आहे होय... पण मग जेव्हा प्लास्टिक नव्हतं, तेव्हा प्रदूषण होत नव्हतं काहोत होतं तर, तेव्हा आपण घरात वापरत असणारे केमिकलयुक्त साबणही प्रदूषण निर्माण करतात. पाण्याचं प्रदूषण होतंम्हणजे पाण्याचं प्रदूषण म्हणजेच फक्त प्रदूषण कानाही रे... प्रदूषण हवा, पाणी, आवाज याचंही होतं. आता मोठमोठ्या आवाजात काही वाजत असेल तर त्याने ध्वनिप्रदूषण होतं. आपण गाड्या चालवतो, त्याच्या धुराने हवाप्रदूषण होतंहं.. पण पर्यावरण आणि प्रदूषण यांचा काय संबंध?
अरे देवा... यांचाच तर संबंध असतो. आपण जितकं प्रदूषण करतो, तेवढं जास्त नुकसान पर्यावरणाला होतं. पाऊस वेळेवर पडत नाही. उष्णता वाढते ऋतू बदलतात. आणि काय काय होतं असतंबाप रे.. पण यासाठी आपण काय करायचंयासाठी आपण शिस्तीत वागायचं. थोडंसं सामाजिक भान बाळगायचं. थोडं जागेपणी वागायचंम्हणजे काय करायचंम्हणजे... प्लास्टिकचे रॅपर नीट जपून ठेवायचे. इकडेतिकडे टाकायचे नाहीत. रस्त्यावर थुंकायचं नाही, पाणी खराब होईल, असं वागायचं नाही.
   हे सगळं तर माहितीच आहे आम्हांला... मग बरं आहे की... आता ते फक्त कृतीत आणायचं... एवढं सोपं आहे पर्यावरण जपणंहो खूपच सोपं आहे...
Powered By Sangraha 9.0