आई - बाबा

शिक्षण विवेक    01-Jul-2024
Total Views |


आई - बाबा  

 आई-बाबा या दोन शब्दांत जणू आपलं सारं विश्व सामावलं आहे. आई म्हणजे ती जिने आपल्याला जन्म दिला. हे सुंदर जग दाखविलं व बाबा म्हणजे ते जे दिवसरात्र आपल्यासाठी कष्ट घेतात. आपल्याला मोठं करण्यासाठी, आपलं जीवन सुंदर करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. असं म्हणतात की, आई ही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा असतात ते आपले बाबा. आपण लहानापासून मोठे होईपर्यंत आपल्यासाठी ते झटतात, कष्ट घेतात व आपल्या सर्व गरजा पुरवतात आपल्याला योग्य वळण लागावं म्हणून आपल्यावर त्यांचे नेहमीच बारीक लक्ष असते. आई-बाबांचं प्रेम निस्वार्थ असते. आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्यासाठी आपण लहानच असतो. आपण यशस्वी व्हावं, हेच त्यांचं स्वप्न असतं. तोच आपल्यावर संस्कार घडवितात व जीवनात योग्य मार्गदर्शन देत असतात. आजच्या आधुनिक युगात लोक आई-वडिलांचं प्रेम विसरत चालले आहेत.
   मुलं मोठी होताचं आई-वडिलांचं प्रेम विसरतात व त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. हे खूप चुकीचं आहे. आपण नेहमीच त्यांचं बोलणं ऐकलं पाहिजे व त्यांना खूश ठेवले पाहिजे. आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद व समाधान हेच आयुष्यातील सर्वांत मोठे यश आहे.

- अक्षरा तोरकर