पर्यावरण

शिक्षण विवेक    02-Aug-2024
Total Views |


पर्यावरण 

पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. आपल्या जीवनासाठी पर्यावरण आवश्यक आहे. पृथ्वीवरील जीवनाचे पर्यावरणाशिवाय अस्तित्व नाही. मानवी जीवन आणि पर्यावरण हे एकमेकांना पूरक आहेत. पर्यावरणामध्ये आपल्या सभोवताली सर्व जैविक घटक आणि अजैविक घटक असतात. दर वर्षी ५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा करतो. ज्यामुळे लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळते आणि पर्यावरणाबाबत जागरूकता येते. पर्यावरणाचे असंख्य फायदे आहेत. हवेतील वातावरण आपल्या शरीराला आवश्यक ऑक्सिजन पुरवते. आपल्याला पर्यावरणातून शुद्ध हवा, पाणी, अन्न मिळते. पर्यावरण जीवनासाठी खूप आवश्यक आहे. पर्यावरण प्रकाश आणि उष्णता देते. वाढत्या लोकसंख्येमुळे आज जंगल तोड होत असून, त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे, जे की आपल्याला थांबवले पाहिजे. पर्यावरण वाचवण्यासाठी संघटित व्हायला हवे. प्रदूषणाशी संबंधित सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल. पर्यावरणाचा शत्रू असलेल्या प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे. पर्यावरण हे आपल्या आईसारखे आहे, जे आपले पालनपोषण करते. त्याचे संरक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
 
- साक्षी डोंगरे