शिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा २०२५ दिनांक २५, २६ आणि २७ सप्टेंबर २०२४ रोजी स्वा. वीर सावरकर अध्यासन केंद्रात सकाळी दहा ते सहा या वेळात संपन्न झाली. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शाळांमधील पूर्वप्राथमिक ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी 'आनंदाच्या गोष्टी' हा विषय देण्यात आल्या होत्या. पडद्यामागून पालकांनी केलेल्या पपेटच्या साहाय्याने मुलांनी आपल्या सादरीकरणातून आनंद या भावनेविषयीच्या गोष्टी सांगितल्या.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत घेण्यात आला. या वेळी पुणे मराठी ग्रंथालयाच्या मुख्य ग्रंथपाल संजीवनी अत्रे, ललिता मोसकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, परीक्षक अमित भिडे आणि शारदा पानगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे आणि परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यांनंतर पाहुणे आणि परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजीवनी अत्रे यांनी मुलांना त्यांच्या वाचनासंबंधी प्रश्न विचारत संवाद साधला. छान संवाद साधणाऱ्या मुलांचे कौतुक करण्यासाठी बुकमार्क दिले. परीक्षक अमित भिडे यांनी आपला स्पर्धेबद्दल अनुभव सांगितला. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन झाले आणि बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मावजेकर यांनी केले.