फॅन्सी ड्रेस स्पर्धा

फॅन्सी ड्रेस स्पर्धा

शिक्षण विवेक    04-Sep-2024
Total Views |


फॅन्सी ड्रेस स्पर्धा 

 
फॅन्सी ड्रेस स्पर्धा

     डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स स्कूल पूर्व प्राथमिक विभागामध्ये मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती संगीता लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली .मुलांच्या अंगी सभाधीटपणा यावा. तसेच वक्तृत्वची कला अंगी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यावेळी विदयार्थी भारतीय नेते, सैनिक , डॉक्टर, विविध फळे, पक्षी अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करून स्पर्धेसाठी आले होते

    या स्पर्धेसाठी प्राथमिक विभागातील वरिष्ठ शिक्षिका श्रीमती नीता बाबर व श्रीमती अनिता येनगुल यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी पालक सुद्धा उपस्थित होते.



श्रीमती संगीता लोखंडे, इनचार्ज
हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स स्कूल,
पूर्व प्राथमिक विभाग,
पिंपरी, पुणे