दामिनी पथकाकडून शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत पालकांसाठी "विद्यार्थी सुरक्षा" मार्गदर्शन कार्यशाळा.

दामिनी पथकाकडून शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत पालकांसाठी "विद्यार्थी सुरक्षा" मार्गदर्शन कार्यशाळा.

शिक्षण विवेक    09-Sep-2024
Total Views |

 
दामिनी पथकाकडून शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत पालकांसाठी

दामिनी पथकाकडून शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत पालकांसाठी "विद्यार्थी सुरक्षा" मार्गदर्शन कार्यशाळा.

दि. ६ सप्टेंबर २०२४ वार : शुक्रवार रोजी निगडी पोलीस स्टेशन दामिनी पथक अंतर्गत शाळेमध्ये पालकांसाठी विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

आपल्या पाल्याची सुरक्षितता लक्षात घेऊन स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घ्यावी, मुलांकडून सायबर क्राईम होऊ नयेत म्हणून काय काय खबरदारी घ्यावी, मोबाईलच्या व्यसनापासून आपल्या पाल्याला दूर कसे ठेवावे , गुड -टच बॅट -टच कसे ओळखायचे? स्वसंरक्षण कसे करायचे, शाळेतून ये - जा करताना छेडछाड झाली किंवा अन्य प्रकारचा कोणताही त्रास झाल्यास आपल्या पाल्याने आपल्याला घरी येऊन लगेच सांगावे यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासोबत योग्य तो सुसंवाद कसा साधावा. तसेच आपणही समाजाचा एक घटक आहोत तर आपणही सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे यावर निगडी पोलीस स्टेशन महिला पोलीस अंमलदार मा.शैला शिंदे व मा.अंजना वाघ यांनी पालकांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

आपल्या पाल्यास सुरक्षा संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास आढळल्यास ११२ नंबर डायल करून दामिनी पथकाकडे आपली तक्रार करावी आम्ही त्याचे निवारण करून दोषींना शिक्षा करू असे आश्वासन त्यांनी सर्व पालकांना दिले.

या कार्यशाळेसाठी १००० पालक उपस्थित होते.

पालकांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा संबंधित मोकळेपणाने चर्चा केली. आपल्या अडचणी व समस्या सांगितल्या .

या कार्यशाळेचे नियोजन शाळेतील विभाग प्रमुख अश्विनी नामदे, अलकनंदा कोरपे , वैभवी फडके यांनी केले.

शाळा समिती अध्यक्ष मा. दामोदरजी भंडारी यांच्या प्रेरणेतून प्राथमिक विभागाचे मा. मुख्याध्यापक श्री. रविंद्र मुंगसे माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका सौ सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन ही कार्यशाळा उत्तम पार पडली .