दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी उपडेट

24 Jan 2025 17:29:07


१० वी बोर्ड परीक्षा

 
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्डाकडून मोठी उपडेट

काही दिवसांपूर्वीच दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे. उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे अत्यावश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांना परिक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

हॉलतीकीट दुरूस्ती तपशील

अधिकृत नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी हॉल तिकीट 2025 मध्ये दुरूस्त्या करता येतील. विद्यार्थ्याचे नाव, आईचे  लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मस्थान यासारख्या काही क्षेत्रात चुका असतील तर तुम्ही बदल करू शकता. दुरूस्त्या करण्यासाठी, उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर सुधारित महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 ‘सुधारणा प्रवेशपत्र’ लिंकद्वारे डाउनलोड करता येईल. विषय किंवा माध्यमात बदल करण्यासाठी शाळांना थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0