म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भक्ती आणि उत्साहात केले गणरायाचे स्वागत

01 Oct 2025 15:24:56

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भक्ती आणि उत्साहात केले गणरायाचे स्वागत
दरवर्षीप्रमाणे यंदाही म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. शाळेतील चिमुकल्यांनी आनंदाने बाप्पाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीगणेश पंचरत्न स्तोत्र व गणपती अथर्वशीर्षाचे सुस्वरात पठण केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा’ ही गोष्ट सांगितली, तर विद्यार्थ्यांनी याचे नाट्यरूपात सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. यावेळी चिमुकल्यांनी गणपतीवर आधारित गोष्टी सांगितल्या, नृत्यातून गणेश वंदना सादर केली. गणेशगीतांनी वातावरण भारावून टाकले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाकडे “सर्वांना सुखी ठेवावे” अशी भावनिक मागणी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तीभाव आणि आनंदी जल्लोष अनुभवायला मिळाला.
Powered By Sangraha 9.0