रमणबाग प्रशालेत वाङ्मय मंडळांतर्गत लेखन कार्यशाळेचे आयोजन

01 Oct 2025 15:03:04

रमणबाग प्रशालेत वाङ्मय मंडळांतर्गत लेखन कार्यशाळेचे आयोजन
 
शनिवार दिनांक २७ रोजी रमणबाग प्रशालेत वाङ्मय मंडळांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रमुख लेखन मार्गदर्शिका अद्वैता उमराणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जपानच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांना आलेला अनुभव त्यांचे स्वावलंबी जीवन आणि शिस्त याविषयी त्यांनी चर्चा केली. अवांतर वाचन व लेखनाचे महत्त्व, परिसराचे वाचन, शाळेतील बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना कशाप्रकारे चौकस बनवतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या लेखन कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मनापासून आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, गाणी, गोष्टी त्यांच्यासमोर सादर केल्या.
शालाप्रमुख अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रविंद्र सातपुते यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शुभांगी पाखरे यांनी पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Powered By Sangraha 9.0