डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत दि. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. व्हिजन स्प्रिंग या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 5 वी ते 10 वी मधील एकूण 2000 विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आहे, त्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मा देण्यात आला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिकाअनिता भोसले यांच्या मार्गदर्शनाने प्रथमोपचार विभागाने शिबिराचे आयोजन प्रथमोपचार विभागप्रमुख गीतांजली सरडे, सहाय्यक शैलेश नागवडे, सारिका पवार यांनी केले. तसेच उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी देखील या नेत्र शिबिर नियोजनासाठी मार्गदर्शन केले.