रमणबाग प्रशालेत विवेकदीप दिवाळी.

18 Oct 2025 11:55:20
 
रमणबाग प्रशालेत विवेकदीप दिवाळी.
   न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये सण व उत्सव साजरे करताना विधायक विचारांची बैठक निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे उद्बोधक व्याख्यान मुख्याध्यापक अनिता भोसले यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले.
सण व उत्सव साजरे करताना त्या मागचा हेतू व त्या मागची भूमिका हा विचार स्पष्ट असला पाहिजे. दिवाळी उत्सव साजरा करताना ज्ञानात्मक विवेकरुपी दिवा आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. फटाके विरहित दिवाळी साजरी करुन पर्यावरणाला जपा.आप्तेष्टांना भेट देताना पुस्तक भेट द्या. सामाजिक समरसता वाढवून सर्वांना आनंद द्या असा संदेश राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले.यावेळी व्यासपीठावर
शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर तसेच पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर हे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0