जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत रमणबाग प्रशाला विजयी

06 Oct 2025 14:44:42
 
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत रमणबाग प्रशाला विजयी
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत रमणबाग प्रशाला विजयी
शालेय जिल्हास्तर खो-खो स्पर्धा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन, सरिता नगरी, सिंहगड रोड, पुणे येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेने समता विद्यालय विरुद्ध एक डाव व तीन गुणांनी प्रथम क्रमांक पटकावला. रमणबाग प्रशालेचा खो-खो संघ पुढे विभागाला खेळण्यासाठी गेला.
विजयी संघातील वेदांत गायकवाड उत्कृष्ट कामगिरी संरक्षणामध्ये २ मि. ३० सेकंद, ४ मि. १५ सेंकदावर चार विकेट, प्रणित सस्ते २ मि. ३० सेकंद व २ मि. ५० सेकंद ,श्रेयश महारुगडे २ मि. आणि अर्णव कुलकर्णी यांनी २ गडी बाद केले.
सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग खो खो संघटना, त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख रमेश शेलार, प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक संतोष पवार व अभय सोरटे यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी खो-खो संघातील खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मनापासून कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0