‘शिक्षण माझा वसा‌’ राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२६

08 Oct 2025 15:00:04


‘शिक्षण माझा वसा‌’ राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२६

 
‌‘शिक्षण माझा वसा‌’ राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करत आहोत. ‌‘शिक्षणविवेक‌’ ही मागील १३ वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात कार्य करणारी सकारात्मक चळवळ आहे. ही क्रियाशीलता अधिक वाढावी म्हणून अंक आणि स्पर्धा-उपक्रम यांच्या माध्यमांतून हजारो विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे शिक्षक. शिक्षकांमुळेच शिक्षण व्यवस्था उभी आहे. अनेक शिक्षक स्वयंप्रेरणेने काम करत असताना आपल्यातल्या क्षमता ओळखत विद्यार्थी केंद्री विचार करतात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, त्यांनी अधिक उन्नत व्हावे, यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशा शिक्षकांसाठी मागील नऊ वर्षांपासून ‌‘शिक्षण माझा वसा‌’ हा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देत आहोत. ‌शिक्षण माझा वसा २०२६‌’ या राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी नामांकने मागवत आहोत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळा आणि खासगी शाळांमधील उपक्रमशील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी नामांकने पाठवावी, ही विनंती.

* पुरस्करासाठीचे विषय :

) भाषा : मराठी/हिंदी/इंग्रजी

) गणित

) विज्ञान

) कला-चित्र/नाट्य/शिल्प/संगीत

) तंत्रज्ञान

) उपक्रमशील मुख्याध्यापक

) विशेष पुरस्कार

* पुरस्काराचे स्वरूप

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रू. ५०००/-

* नामांकनासाठीचे नियम व निकष :

* नामांकन पाठविणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय ५० वर्षे असावे.

* मुख्याध्यापकांना पुरस्कारासाठी वयाची अट नाही.

* जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे.

* शाळा अनुदानप्राप्त असल्याचा दाखला आवश्यक आहे. (खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी)

* किमान ३ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* कला शिक्षकांसाठी शासन नियुक्ती अनिवार्य आहे.

* नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२५

* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

* नामांकन कसे पाठवावे? :

* शिक्षकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, फोटो, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.

* उपक्रमांसंबंधीची छायाचित्रे किंवा व्हिडीओ पाठवणे अनिवार्य आहे.

* वरील सर्व माहिती https://forms.gle/r6f35iHMbYZBW5Ew9 या गुगल फॉर्ममध्येच भरायची आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112257774, 7045781685

Powered By Sangraha 9.0