दिनांक: ११ नोव्हेंबर २०२५
वार: मंगळवार
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "सहज योग मार्गदर्शन कार्यक्रम" आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. मारणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टावर थोडक्यात प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मनःशांती व एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगितले.
श्री. मारणे सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना सहज योग म्हणजे काय, त्याची गरज का आहे आणि तो दैनंदिन जीवनात कसा उपयुक्त ठरतो हे सविस्तरपणे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की सहज योग हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग असून तो मन, बुद्धी आणि आत्मा यामध्ये संतुलन निर्माण करतो.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ध्यानधारणा करून दाखवली व श्वसनाच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना मनःशांती, एकाग्रता आणि सकारात्मक विचारांची अनुभूती मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि दररोज सहज योगाचा सराव करण्याचा संकल्प केला.
एकूणच हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी लाभदायक ठरेल..