क्रीडा भारती ज्ञान परीक्षा बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा!

20 Nov 2025 15:43:28

क्रीडा भारती ज्ञान परीक्षा बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा!
 
 दिनांक: ८ नोव्हेंबर २०२५, शनिवार
   प्रशालेच्या मैदानावर क्रीडा भारती ज्ञान परीक्षा बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला क्रीडा भारती संस्थेचे मान्यवर तसेच प्रशालेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश आपटे सर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष, क्रीडा भारती,
विजय राजपूत सर, अखिल भारतीय कार्यालय प्रमुख, क्रीडा भारती, आणि अनुजा दाभाडे मॅडम, पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री, क्रीडा भारती उपस्थित होते.
   कार्यक्रमाची सुरुवात मंगल वंदनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका जयश्री शिंदे मॅडम, तसेच क्रीडा शिक्षक आणि सर्व शिक्षकवृंद
आपले प्रेरणादायी भाषण करताना आपटे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की,
“यश मिळवण्यासाठी तयारी आजपासूनच सुरू करा. नियमित सराव आणि एकाग्रता यामुळेच तुम्हाला भविष्यात अव्वल क्रमांक मिळवता येईल.”
यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे बक्षीस वितरण समारंभ झाला.
   क्रीडा भारती ज्ञान परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान पाहून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
तसेच, या परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल प्रशालेलाही विशेष गौरवचिन्ह ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी आपटे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करून क्रीडा संस्कार आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांत प्रगती साधा असा संदेश दिला.
   या कौतुक सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील वर्षी अधिक जोमाने सहभाग घेण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.
Powered By Sangraha 9.0