डिजिटल सुरक्षितता काळाची गरज...

28 Nov 2025 17:43:16

mes
 
      म. ए. सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशाला येथील इयत्ता दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण स्वतःच्या कल्पनाशक्तीतून डिजिटल लॉकिंग सिस्टीम म्हणजेचWIRELESS हा प्रोजेक्ट तयार केला होता हा प्रोजेक्ट इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना जिल्हास्तरीय प्रदर्शनामधून राज्यस्तरावर गेला आहे.
या लॉक चे वैशिष्ट्य म्हणजे चावी शिवाय कुलूप. चावी हाताळणे सांभाळणे हरवल्यास निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देणे अतिशय जिकरीचे झाले आहे. चावी चोरीला गेल्यास अनेक बाबी घडलेल्या आपल्या निदर्शनास आले आहेत. या अनेक निरीक्षणांचा उपयोग करून इयत्ता दहावी शिकणाऱ्या मंथन धावडसकर या विद्यार्थ्याने रिमोट कंट्रोलच्या साह्याने wireless smart door lock हा प्रकल्प तयार केला आहे. ज्यामुळे अबाल वृद्धांपासून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत परवडेल असे हे डिजिटल लॉक नक्कीच लोकउपयोगी होणार आहे.
सध्या या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यासाठी मंथनचे मार्गदर्शक सौ. स्वप्नाली देशपांडे मॅडम तसेच प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी मंथनला मार्गदर्शन केले आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापक मा. श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. सुनीता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका जयश्री शिंदे मॅडम यांनी मंथनने मिळालेल्या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरांसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.....
Powered By Sangraha 9.0