संकटकाळातील प्रयोग

05 Nov 2025 16:33:04

संकटकाळातील प्रयोग
 
      मनुष्याचे जीवन हे सुख- दुः ख, यश –अपयश अशा अनेक गोष्टींनी भरलेले असते प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात, कधी नैसर्गिक आपत्ती, कधी आजार तर कधी आर्थिक अडचणी अशा वेगवेगळया रूपांत संकट आपल्यासमोर उभी राहतात. पण या संकटकाळात माणसाने जर योग्य प्रयोग केले, तर त्यातून नवी दिशा मिळते आणि समाजाला प्रेरणाही मिळते. संकटकाळातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे कोरोना महामारी; त्या काळात शाळा, महाविद्यालये दवाखाने, कार्यालय हे
सर्व बंद झाले होते.
      सुरुवातीला सर्वजण घाबरले होते पण लगेचच नवीन प्रयोग करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात, ऑनलाइन वर्ग सुरू झाले मोबाईल, संगणक इंटरनेट, यांच्या मदतीने शिक्षक व विद्यार्थी यांचा संवाद कायम राहिला, यामुळे मुलांचे शिक्षण थांबले नाही हा प्रयोग संकट काळात अत्यंत उपयोगी ठरला. तसेच वैद्यकीय क्षेत्रातही अनेक पथ प्रयोग झाले. डॉक्टरांनी नवीन औषधे, उपचारपद्धती, लसीकरण हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवले लोकांनी घरातून काम करण्याचा प्रयोग केला. काहींनी लहान – मोठ्या व्यवसायाचे नवे मार्ग। शोधले उदाहरणार्थ शिवणकाम करणाऱ्या महिलांनी मास्क तयार केले, शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यत भाजीपाला पोहोचवण्याचा
प्रयोग केला. तसेच अनेक महिलांनी घरच्याघरी बेकरी उत्पादने तयार करून, विकायला सुरुवात
केली. या प्रयोगांमुळे लोकांचा उदरनिर्वाह सुरू राहिला.
      नैसर्गिक संकटाच्या काळातही लोक अनेक प्रयोग करतात दुष्काळ पडला तर पाणी टप्प्याटप्प्याने वापरतात, पूर आला तर आश्रयस्थान, अन्नछत्र यांसारखे प्रयोग करून समाजाची सेवा करतात याच काळात “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या वाक्याचा खरा अर्थ कळतो. माणसासाठी माणुसकीने माणूस उभा राहतो. एकमेकांना मदत करण्यासाठी नवनवे उपाय सुचतात. म्हणूनच संकट आली, की आपण निराश होऊ नये. संकट म्हणजे आपल्याला थांबवणारी भिंत नसून, नवे मार्ग दाखवणारी खिडकी असते. संकटाच्या वेळी केलेले प्रयोग, केवळ त्या काळापुरतेच मर्यादीत नसतात तर पुढील आयुष्य घडवणारे असतात. ज्या व्यक्तीस किंवा समाजास संकट काळात, नवे प्रयोग करण्याची हिंमत असते,तेच खरे प्रगतीपथावर पोहोचतात
नाव : सई प्रमोद पायगुडे
इयत्ता : १० वी 
शाळेचे नाव- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
महिलाश्रम हायस्कूल तकर्वेनगर
पुणे-
Powered By Sangraha 9.0