
दिवाळी संपली की सुरू होते ती गुलाबी थंडी. या गुलाबी थंडीमध्ये अगदी स्वेटर मफलर घालून शाळेत जाणार हे छोटे छोटे बालचमू अगदी आनंदाने उत्साहाने शाळेत जातात.अहो त्याचे कारणच वेगळे आहे. कारण शाळेत धामधूम सुरू असते ती गॅदरिंगची यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटी प्रायमरी विभाग सकाळ सत्र व दुपार सत्र स्नेहसंमेलनासाठी सज्ज झाले. यासाठी वेगवेगळे विषय निवडण्यात आले. सकाळ सत्र इयत्ता पहिली व दुसरी साठी मी आणि माझे विश्व, सकाळ सत्र इयत्ता तिसरी व चौथीसाठी महाराष्ट्राची लोकधारा या विषयांची निवड करण्यात आली.बाल विश्वात रममाण होणारे त्यांचे विषय म्हणजेच छानसे कार्टून गंमत जंमत आपले कुटुंब निसर्ग त्याचप्रमाणे देशभक्ती असे विविध विषय घेऊन स्नेहसंमेलनासाठी एकूण १२०० विद्यार्थी सज्ज झाले. गण-गवळण, गणपती नमन, वासुदेव,भारुड, कोळी डान्स,बाल्या डान्स, लावणी, वारी,अहो मंगळागौर त्याचप्रमाणे गावाकडची जत्रा गोंधळ आणि महाराष्ट्राचे गौरव गान करणारे उत्तुंग भरारी अशा महाराष्ट्र विविध अंगाने नटलेल्या महाराष्ट्राची गौरव सांगणारी ही बालकलाकार मंडळी रंगमंचावर सज्ज झाली. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा उत्साह देखील तेवढाच दिसून आला सकाळ दुपार सत्रातील पालकांनी देखील ढोल ताशाच्या पथकाद्वारे शालेय उपक्रमात आपला सहभाग दर्शवला. दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी निसर्ग या विषयावर पाऊस, पावसाळा, इंद्रधनुष्य,नदी,झाड- फुल, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, आपले सण त्याचप्रमाणे प्लास्टिकचा करा धिक्कार व कापडाचा करा स्वीकार अशा पद्धतीचे संदेश देणारे कार्यक्रम इयत्ता पहिली व दुसरीने सादर केले. तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी भारत देशातील विविध राज्यांची सफर प्रेक्षकांना घडवून आणली. यावेळेस सर्व प्रेक्षकांनी काश्मीर, पंजाब,उत्तराखंड, राजस्थान, कोकण,बंगाल,गोवा, महाराष्ट्र, केरळ,आसाम अशा विविध राज्यांना भेट देऊन त्या राज्यातील विविध नृत्यांचा अनुभव घेतला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका अर्चना धनावडे दोन्ही सत्रातील पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा व सिमरन गुजर, शाळा समिती अध्यक्ष राजश्री ठकार मॅडम तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवांजली डान्स अकॅडमीच्या सर्वेसर्वा अनुजा भाटे व कोरिओग्राफर निकिता मोघे लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकार, सायली मराठे, प्राजक्ता साळवी तसेच आरती पाटील यांनी केले.