डी.ई.एस.सेकंडरी शाळेत‘तेजोभूमी तपोभूमी’ व ‘मर्म राष्ट्रीयत्वाचे’

24 Dec 2025 15:40:20

tejobhumi
 
      पुणे : डी.ई.एस.सेकंडरी शाळेतील सकाळ व दुपार विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या मैदानात भारतीय ‘तेजोभूमी तपोभूमी’ व ‘मर्म राष्ट्रीयत्वाचे’ त्यांच्या प्रतिभा व कलागुणांच्या आविष्कारातून साकारले.
स्नेहसंमेलनामध्ये देशाचा स्वाभिमान, अभिमान, पर्यावरण स्वच्छता अभियान, लोकशाही,भारतीय इतिहास, पराक्रम,परंपरा, ज्ञान, योग, खेळ आदी विषयांचा सुरेख संगम साधण्यात आला. सकाळ व दुपार विभागाला प्रमुख पाहुणे म्हणून संगणक तज्ञ व वक्ते संजय भंडारे, करिअर मार्गदर्शक संजय कुलकर्णी लाभले. या वेळी शाला समिती अध्यक्षा राजश्री ठकार,
शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी, पालक संघाच्या उपाध्यक्षा, अभिजीत शिराळकर आदी उपस्थित होते.
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ‘पूजा’ नृत्य जयोस्तुतेचे सादरीकरण झाले. प्रास्ताविक विजया जोशी, काजल चौधरी यांनी केले. राजश्री ठकार यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.पाहुण्यांचा परिचय ईशा लिखिते, प्राची कुलकर्णी यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. संजय कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात देशाचे महत्त्व सांगून देशभक्तीवर भर दिला. संजय भंडारे यांनी त्यांच्या भाषणात “आपल्याला भारतीय मूळ परंपरा माहीत पाहिजे असे सांगून मोबाईल सोडून कुटुंबाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. शिवाय भारतीय वारसा पुढील पिढीला सोपवत भारतभूमी, देवभूमी, पुण्यभूमी देश सर्वप्रथम ही मूल्ये रुजवली पाहिजे असेही
सांगितले.” विजया जोशी यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना स्वच्छते संदर्भात कृतिशीलतेने जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमांमध्ये पंचमहाभूते-मानव निर्मिती, सेतुबंधन, मैं उस भारत से आता हूं, बारा बलुतेदार, राजं आलं, नरसिंघे,अष्टप्रधान, (नाटक), स्पोर्ट्स डेमो व नृत्य, छाती केसरीची, नाट्यपरंपरा, वंदे मातरम् , योग व आयुर्वेद, हे वतन वतन मेरे, भारत अनोखा राग है, लोकशाही, भारत माझा देश आहे, आर्मी (नाटक),देश रंगीला, मूल्यशिक्षण, देते कोण?, गौतम बुद्ध (नाटक), स्वछता (हिंदी नाटक), संस्कृत व मराठी (नाटक), माईम, स्वच्छता की ज्योत, संत परंपरा, पसायदान नृत्य, गंधर्व महाविद्यालय गीत, आरएसएस गीत, माईम ॲक्ट इकॉनॉमी, वैज्ञानिक, वैद्य, राजकीय नाटक, मैं भारत हूं, महिला सशक्तिकरण( शाखा), देशभक्तीपर गीत,परेड इत्यादी कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. शर्व दाते याने ‘मैं उस भारत से आता हूं ’ हिंदी कविताचे उत्तम सादरीकरण केले. दोन्ही विभागांमध्ये गीत, नृत्य, नाट्य,अभिनय, संगीत, गायन आदींचे उत्तम सादरीकरण झाले. स्नेहसंमेलनात शिक्षक व विद्यार्थ्यांचे परिश्रम दिसून येत होते. ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून कौस्तुभ कानडे व सुवर्णा सहस्त्रबुद्धे तर उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून मारुती सोमवारे यांना पुरस्कार देण्यात आला. शाळेतील या वर्षाचे दहावी मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अनिमेष महाजन, भार्गव ब्रह्मे तर विद्यार्थिनी म्हणून गौतमी प्रभुणे, सान्वी होळकर यांचा गौरव करण्यात आला. नेतृत्व पुरस्कार आर्या जोशी, सुरभी मोडक, आराध्या खुडे, रुची मारुलकर, शर्व दाते, मृणाल देशपांडे, शौर्य लोहोकरे, विपुल आडकर, यशस्वी चव्हाण, पार्थ कुलकर्णी तर विशेष पुरस्कार (जर्मन) मृणाल देशपांडे, ज्ञानदा कुलकर्णी, स्वरा करकरे यांना मिळाला. सूत्रसंचालन सुप्रिया शेट्टी, सुवर्णा सहस्त्रबुद्धे यांनी केले. विद्यार्थ्यांनी निवेदन केले. लक्ष्मी मालेपाटी यांनी आभार मानले. वंदे मातरम् व पसायदानाने सांगता झाली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनात सर्वांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0